अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2021 :- आपण ओप्पो स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास आपल्यासाठी एक उत्तम ऑफर आहे. ई-कॉमर्स वेबसाइटवर आकर्षक डिस्काउंट व डील्स ऑफर देण्यात येत आहेत.
अमेझॉनवर शानदार सूट घेऊन फोन खरेदी करता येईल. ओप्पो फॅटास्टिक डेज सेल आजपासून म्हणजेच 8 जानेवारीपासून Amazon वर लाइव झाला आहे. हा सेल 12 जानेवारीपर्यंत चालेल.
या बँक कार्डांवर 10 टक्के इंस्टेंट डिस्काउंट – ओप्पो फॅटास्टिक डेज सेलमध्ये एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि एसबीआय बँक कार्ड्ससह खरेदीवर दहा टक्के त्वरित सूट मिळेल. याशिवाय नो-कॉस्ट ईएमआय, एक्सचेंज ऑफर आणि प्रीपेड ऑफर देखील उपलब्ध असतील. या सेलमध्ये तुम्ही ओप्पोचे कोणते स्मार्टफोन घेऊ शकता ते पाहूया-
ओप्पोच्या या स्मार्टफोनवर बम्पर सूट –
- –या सेलमध्ये ओप्पो एफ 17 हा 9 महिन्याच्या नो-कॉस्ट ईएमआयवर घेण्याची संधी आहे. 20,990 रुपयांऐवजी हा फोन 16,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. त्याचप्रमाणे ओप्पो एफ 17 प्रो स्पेशल एडिशन 26,990 रुपयांऐवजी 21,490 रुपयांना घेता येईल. या फोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले आहे.
- – या सेलमध्ये ओप्पो ए53 हँडसेट 15,990 रुपयांऐवजी 12,990 रुपयांमध्ये घेता येईल.
- – ओप्पो फाइंड एक्स 2 हा 64,990 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे. या फोनवर अतिरिक्त 13 हजार रुपये प्रीपेड ऑफ देखील आहेत.
- – एआय ड्युअल रियर कॅमेर्यासह ओप्पो ए 12 हा 11,490 रुपयांमध्ये सेलमध्ये उपलब्ध झाला आहे. या फोनवर अतिरिक्त 2 हजार रुपये प्रीपेड सवलत आहे.
- – या सेलमध्ये ओप्पो ए 15 स्मार्टफोन 9,490 रुपयांमध्ये घेता येईल. हँडसेटवर 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआई देखील आहे.
- – 21,490 रुपयांमध्ये ओप्पो एफ 17 प्रो घेण्याची संधी आहे. याशिवाय 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय देखील आहे.
- – ओप्पो ए 11 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा आहे. हा फोन 8,490 रुपयांमध्ये खरेदी करण्याची संधी आहे.
- – याशिवाय 4000 mAh बॅटरीसह ओप्पो ए 1 के हा 7,990 रुपये, ओप्पो ए 15 एस 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 11,490 रुपये, ओप्पो ए 5 एस 8,990 रुपये आणि 34,990 रुपयांमध्ये ओप्पो रेनो 4 प्रो खरेदी करता येईल.
ओप्पोच्या या प्रोडक्ट्सवरही सूट –
या सेलमध्ये ओप्पो वॉच सिरीजदेखील 19,990 रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. ओप्पो वाच बद्दल कंपनी सांगते की ते 21 दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ देते. ओप्पो Enco W11 इयरबड्स 1,999 रुपयांना, Enco W31 हे 2,999 रुपयांना, Enco W51 हे 4,999 रुपयांना आणि Enco M31 हे 1,799 रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved