अहमदनगर Live24 टीम, 13 डिसेंबर 2020 :-नवीन कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. मात्र विरोधक त्याचे भांडवल करून जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसचे विरोधकांनी या कायद्याला त्यावेळी समर्थन दिले होते.
मात्र आता विरोधाची भाषा बोलत असून कृषी कायद्यात देखील राजकारण करत असल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. राम शिंदे म्हणाले कृषी कायद्यात ज्या सुधारणा काँग्रेसने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात नमूद केल्या होत्या.
त्याच आता केंद्र सरकारने केल्या असताना आता काँग्रेसचा विरोध का. काँग्रेसने स्वतःच्या घोषणा पत्रामध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर बाजार समित्यांच्या कायदा दुरुस्ती करण्यात येईल आणि शेतीमालाच्या खुल्या व्यापारासाठी व्यवस्था करण्यात येईल असे म्हटले होते. मात्र आता या कायद्याच्या विरोधामध्ये बोलू लागले आहेत.
एक प्रकारे यामध्ये राजकारण सुरू झाले आहे व जनसामान्यांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत असल्याचा आरोपही शिंदे यांनी यावेळी केला. या कायद्याने शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालाला जेथे जास्त भाव आहे, तिथे जाऊन विकता येणार आहेत.
देशातील कोणत्याही राज्यात सहजपणे विकता येणार आहे. इ-ट्रेडिंगसाठी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. बाजारपेठेतील मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळू शकतात असा या विधेयकाचा फायदा आहे. शेतकऱ्यांना पिकवलेला मालाला हमीभाव या कायद्याच्या आधारे मिळेल.
त्यासाठीही तरतूद करण्यात आलेली आहे. बाजार समित्यांचे अस्तित्व कायमच राहणार आहे पण जर त्यांना शेतमाल खरेदीमध्ये उतरायचे असेल तर त्यांना स्पर्धा करावी लागेल. केंद्र सरकारने वेगळ्या प्रकारचे विधेयक मांडून ती मंजुरी केलेली आहेत. मात्र आता केवळ पंतप्रधान मोदींनी विरोध करण्यासाठी अनेकांची दुटप्पी भूमिका असल्याचेही ते म्हणाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com