खासदार सुप्रिया सुळे यांनी ठेवले हे स्टेट्स !

Ahmednagarlive24
Published:

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपने अजित पवार यांच्यासह १५ ते २० आमदारांना फोडून ही सत्ता स्थापन केल्याचं स्पष्ट झालं आहे.

ज्याच्या इतिहासात सर्वात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि पवार कुटुंबीय यांच्या फुट पडल्याचे स्टेट्स व्होट्सअप वर ठेवले आहे.

शरद पवार यांनी अजित पवारांचा निर्णय पक्षाचा निर्णय नसून तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे म्हटले होते. त्यानंतर पवार कुटुंबीयात फुट पडल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

खासदार सुळे यांनी पार्टी आणि कुटूंबात फूट पडल्याचे सांगत इंग्रजीतून ‘Parti and family split’ स्टेट्स    ठेवले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment