पंकजा मुंडे म्हणाल्या चुका दुरुस्त करून पक्ष भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-पदवीधर निवडणूक निकालानंतर भाजपच्या प्रमुख नेत्यांनी माध्यमांसमोर येण्याचे टाळले तर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी मात्र हार किंवा जीत जे काही असते त्याची जबाबदारी पक्षाच्या नेतृत्वाची असते.

त्यामुळे जे काही परिणाम आले आहेत त्यातील चुका दुरुस्त करून पक्ष भविष्यात आणखी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या कोअर समिती बैठकीला माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पंकजामुंडे, विनोद तावडे यांच्या सह प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजर होते.

या बैठकीनंतर पक्षाकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आली नसली तरी या पराभवाची जबाबदारी स्विकारताना तीन पक्षांसमोर भाजपची हार हेणे अपेक्षितच होते अशी भावना प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी व्यक्त केल्याचे समजते.

तर शिवसेनेच्या आत्मघातकी राजकारणामुळे भाजपला नुकसान होत असल्याचा निष्कर्ष विरोधीपक्ष नेते फडणवीस यांनी बैठकीत केलेल्या निवेदनातून समोर आल्याचे या सूत्रांनी सांगितले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe