पारनेर – तालुक्यातील अपघूप भागातील खंडेश्वर मंदिरात १२ मे रोजी १२ च्या सुमारास एका १८ वर्ष पूर्ण न झालेल्या अल्पवयीन मुलीचा तिने वय १८ वर्ष पूर्ण झालेले नाही हे माहीत असतानासुद्धा तिचे आई – वडील व मुलांकडच्यांनी विवाह लावला.
याप्रकरणी काल मुलीचे वृद्ध नातेवाईक विश्न शिवराम गवळी , वय ६८, रा. अपधूप , ता. पारनेर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विकास बबन कोल्हे, विकास बबन कोल्हेचे वडील, रा. थोल्हेगाव, ता. नगर, नवनाथ कचरू गवळी, अनिता नवनाथ गवळी, दोघे रा. अपधूप, ता. पारनेर,

मुलीचे आई वडील यांच्याविरुद्ध भादवि कलम बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे सुपा पोलिसांत गुन्हा १३१ दाखल करण्यात आला असून राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पो ना शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
- भारताच्या हाती सुपर डिफेन्स सिस्टम, S-500 मुळे चीन-पाकिस्तान दोघांनाही झटका!
- फ्रीजमध्ये दोन-दोन दिवस अन्नपदार्थ ठेवताय? मग एकदा नक्की वाचा हा हादरून टाकणारा रिपोर्ट!
- क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार लगावणारे टॉप-5 खेळाडू, नंबर 1 वर ‘या’ भारतीय कर्णधाराने मारली बाजी!
- ‘या’ टॉप-10 परवडणाऱ्या देशांमध्ये कमी बजेटमध्येही जगता येईल आलिशान आयुष्य; पाहा यादी!
- …म्हणून भगवान जगन्नाथांना अर्पण करतात कडुलिंबाचा नैवेद्य; वाचा यामागील रंजक आणि भावनिक कथा!