पारनेर :- एसटीच्या वर्धापनदिनीच आगारातील एका सुरक्षा रक्षकाने आगारात मोटारसायकल नेण्यासाठी मज्जाव केल्यानंतर दोन्ही बाजूंनी वाद होऊन हाणामारी झाल्याचा प्रकार शनिवारी दुपारी पारनेर आगारात घडला.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर एसटी आगारात शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास वीज मीटरचे रिडींग घेण्यासाठी नवनाथ व्यवहारे हा चालला असताना सुरक्षारक्षक रामचंद्र तराळ यांनी त्यास मोटारसायकल आत नेण्यास विरोध केला.
वीजमीटरचे रिडींग घेण्यासाठी जायचे असल्याचे त्याने सांगितले. मात्र मोटारसायकल इथेच ठेऊन आत पायी जावे लागेल , असे सुरक्षारक्षक तराळ यांनी सांगितले. याचा राग धरून नवनाथ व्यवहारे याने तराळ यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
त्यातून दोघांमध्ये वाद होउन हाणामारी झाली. नंतर एसटी आगारातील अधिकारी व कर्मचारीयांनी वाद मिटवला. दरम्यान दोन्ही बाजूनी परस्परविरोधी तक्रारी पारनेर पोलीस ठाण्यात देण्यात आल्या असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पारनेर एसटी आगारात तराळ व व्यवहारे यांच्यातील वाद गैरसमजुतीतून झाला असल्याचे आगारप्रमुख पराग भोपळे यांनी महावितरणच्या वरिष्ठांना सांगून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.दरम्यान याबाबत दोन्ही बाजूंनी पारनेर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
- केंद्र सरकारची आठव्या वेतन आयोग स्थापनेला मंजुरी ; पगारात काय फरक पडेल ?
- 8th Pay Commission Breaking : एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना लाभ; 2026 पासून होणार लागू
- 8th Pay Commission : कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर ! आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला केंद्राची मंजुरी
- माणसाचे गीत गाणारे – डॉ. सुधीर तांबे
- लोकसर्जन – मा.आ.डॉ सुधीर तांबे.