पारनेर – लोणी हवेली रस्त्यासाठी जिल्हा परिषदेकडून सोळा लाखांचा निधी मिळाल्यामुळे या रस्त्यावरील वसाहतींमधील जनतेला दिलासा मिळाला आहे. या रस्त्यावर अनेक नव्या वसाहती झाल्या असून, रस्त्यांवरील खड्डयांमुळे नागरिक त्रस्त होते.
पावसाळयात नागरिकांना रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत असे. रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी नगराध्यक्षा वर्षाताई नगरे, उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, नगरसेविका सुरेखा भालेकर यांनी जि. प.चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, जि. प. सदस्या सुप्रिया झावरे यांच्या निधीमधून या रस्त्यासाठी जि. प. ने सोळा लाखांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामास सुजित झावरे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे अर्जुन भालेकर यांनी सांगितले.
यापूर्वी माजी आ. स्व. वसंतराव झावरे यांनी या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. त्यांच्यानंतर या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची आपणास संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे झावरे यांनी सांगितले.
झावरे यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबदद्दल उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे, अर्जुन भालेकर, नंदकुमार देशमुख, योगेश मते, दीपक नाईक, दादा शेटे, बाळासाहेब मते आदींनी त्यांचे आभार मानले.
- टाटा समूहाचा ‘हा’ स्टॉक गुंतवणूकदारांना मालामाल बनवणार ! अमेझॉनसोबत डील झाली अन स्टॉक 361 वर पोहचला
- ‘या’ बँका देतायेत सर्वात स्वस्त Home Loan, घर खरेदीचे स्वप्न होणार साकार !
- Tata Nexon EV मधील हे मॉडेल झाले बंद ! का घेतला टाटांनी हा धक्कादायक निर्णय ?
- ब्रँडेड वस्तू विकणाऱ्या कंपनीचा आयपीओ अखेर खुला झालाचं! गुंतवणूकदारांना ‘या’ तारखेपर्यंत गुंतवणूक करता येणार
- 77 रुपयांचा ‘हा’ स्टॉक 117 रुपयांवर जाणार ! एक्सपर्ट म्हणतात तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढे लावा, कारण….