निलेश लंके यांचे दैवत अचानक बदलल्याने आश्चर्य वाटते !

Published on -

पारनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवण्यासाठी मी गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले. मात्र, पक्षाने अचानक, कोणालाही विश्वासात न घेता तालुक्यातील पक्ष नेतृत्वाबाबत वेगळा निर्णय घेतला. पक्षातील काही ज्येष्ठ नेते याला जबाबदार आहेत. मी नव्हे, तर पक्षानेच मला फसविले, अशी टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी केली.

पारनेर तालुक्यातील देवीभोयरे, ढवळपुरी, पुणेवाडी, वडगाव दर्या या गावांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय, रस्ते, सभामंडपासह अन्य ९२ लाख रुपयांच्या विकासकामांना त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला. त्या वेळी ते बोलत होते. यावेळी सुजित झावरे यांनी प्रथमच निलेश लंके यांच्यावर टीका केली.

पक्षात नव्याने दाखल झालेले युवा नेते मागील काही वर्षे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत, असे सांगत होते. त्यांचे दैवत अचानक बदलल्याने आश्चर्य वाटते. असा सवाल करत झावरे म्हणाले ज्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काहीच योगदान नाही,

त्यांना संधी देऊन पक्ष काय साध्य करणार आहे ? विकासकामे करताना कोणत्या गावाने किती मते दिली, याचा कधी विचार केला नाही. दुष्काळी व आदिवासी भागाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!