‘हे’ काम घेवून सुजित झावरे अजित पवारांच्या भेटीला

Ahmednagarlive24
Published:

पारनेर -पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांना सभापती पदावरून हटवण्यासाठी राष्ट्रवादीच्या संचालक मंडळांनी सुजित झावरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांची भेट घेतली.

सभापती प्रशांत गायकवाड यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या राष्ट्रवादीच्या संचालकांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेेते अजित पवार यांच्याकडे आपल्या भावना व्यक्त करत बाजार समितीची निवडणूक झाल्यानंतर प्रशांत गायकवाड यांना एक वर्षाचा कार्यकाळ ठरवण्यात आला होता.

परंतु तीन वर्ष होऊन ही गायकवाड यांनी सभापती पदावरून पायउतार होण्यास नकार दिल्याने राष्ट्रवादीचे ते नऊ संचालक गेल्या दोन वर्षापासून नाराज होते.

सभापती गायकवाड यांना तात्काळ पायउतार करण्याची मागणी सुजित झावरे यांच्यासह संचालकांनी केली आहे यावेळी अजितदादा पवार यांना संचालक मंडळाने सभापती प्रशांत गायकवाड हे बाकी संचालकांना विश्वासात घेत नसून बाजार समितीत अविश्वासाचे वातावरण तयार झाले आहे.

त्यामुळे सभापती गायकवाड यांना होवुन नवीन संचालकाला संधी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली यावेळी अजितदादा पवार यांनी याबाबत आठ दिवसात निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे.

या शिष्ट मंडळात बाजार समितीचे उपसभापती विलास झावरे, संचालक गंगाराम बेलकर, अरूण ठाणगे, राजेश भंडारी, राहुल जाधव, विजय पवार, सोपान कावरे, खंडु भाईक व मीराताईं वाकडे आदी उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment