पारनेर :- बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्या विरोधात विधानसभा उपाध्यक्ष ना.विजय औटी व सुजित झावरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अविश्वास ठराव दाखल केला होता.
परंतु सभापती गायकवाड यांनी विरोधी संचालक ताब्यात घेवून खेळी केली. तसेच काही संचालक गैरहजर राहिल्याने हा अविश्वास ठराव बारगळला आहे. त्यामुळे विधानसभा पाठोपाठ ना.विजय औटी व सुजित झावरे यांना हा धक्का मानला जात आहे.


सभापती गायकवाड यांच्याविरोधात शिवसेनेचे संचालक काशिनाथ दाते, अशोक कटारिया, युवराज पाटील यांच्यासह उपसभापती विलास झावरे, राष्ट्रवादीचे संचालक अरुण ठाणगे, राहुल जाधव,
गंगाराम बेलकर, राजेश भंडारी आदी संचालक आहेत. तर शिवाजी बेलकर, अण्णासाहेब बढे, संगीता कावरे,राजश्री शिंदे हे चार संचालक सभापती गायकवाड यांच्या बाजूने आहेत.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शुक्रवार दि.२५ ऑक्टोबरला विशेष सभा होणार असल्याने याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले होते. परंतु सभापती गायकवाड हे दुसर्यांदा अविश्वास ठराव बारगळण्यात यशस्वी ठरले आहेत.
- अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !
- रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स
- अब्जावधी रुपये खर्चुनही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
- Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
- Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…