पारनेर :- नगर जिल्ह्यात पुरोगामी म्हणून ओळख असणाऱ्या पारनेर तालुक्यात मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे.
पारनेर तालुक्यातील पोखरी मध्ये स्वताच्या १६ वर्षीय अल्पवयीन नातीवर आजोबा व नातवाने गेल्या वर्षी अत्याचार केल्याने ती मुलगी गर्भवती राहिली.

पोखरी येथील संबंधित आजोबा व नातवाच्या विरोधात पारेनर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, या दोघांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पिडीत १६ वर्षाची मुलगी शेतात काम करत असताना आजोबा व नातवाने बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला.
यासंबंधी कुठे वाच्यता केली तर जीवे मारण्याची धमकी दिली. या धमकीमुळे या मुलीने कोणालाही हा प्रकार सांगितला नाही.

पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने तिच्या पोटात वारंवार दुखू लागले. त्यामुळे तिला वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले असता ती नऊ महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले आहे.
याप्रकरणी पीडित मुलीने पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे दरम्यान या प्रकरणी आजोबा व नातवास पोलिसांनी अटक केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
- भारताच्या हाती सुपर डिफेन्स सिस्टम, S-500 मुळे चीन-पाकिस्तान दोघांनाही झटका!
- फ्रीजमध्ये दोन-दोन दिवस अन्नपदार्थ ठेवताय? मग एकदा नक्की वाचा हा हादरून टाकणारा रिपोर्ट!
- क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार लगावणारे टॉप-5 खेळाडू, नंबर 1 वर ‘या’ भारतीय कर्णधाराने मारली बाजी!
- ‘या’ टॉप-10 परवडणाऱ्या देशांमध्ये कमी बजेटमध्येही जगता येईल आलिशान आयुष्य; पाहा यादी!
- …म्हणून भगवान जगन्नाथांना अर्पण करतात कडुलिंबाचा नैवेद्य; वाचा यामागील रंजक आणि भावनिक कथा!