जनतेच्या हिताची कामे आपण प्रामाणिकपणे मार्गी लावतो – सुजित झावरे

Ahmednagarlive24
Published:

पारनेर :- विकास कामांबाबत आपण कोणाशीही स्पर्धा करत नाही. जनतेच्या हिताची कामे आपण प्रामाणिकपणे मार्गी लावतो, असे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी सांगितले.

भाळवणी ते भांडगाव रस्त्याच्या कामाचे भुमिपूजन झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानिमीत्त आयोजित कार्यक्रमा ते बोलत होते.

यावेळी सरपंच अशोक खरमाळे, श्याम खरमाळे, बबन पवार, सरूदास भुजबळ, पोपट शिंदे, योगेश शिंदे, पप्पू शिंदे, प्रशांत शिंदे, बबन खरमाळे आदी उपस्थित होते.

झावरे म्हणाले, गेल्या तिस वर्षांपासून या रस्त्याचे काम प्रलंबित होते. ग्रामस्थांनी रस्त्याची मागणी केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपण निधी उपलब्ध करून दिला. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment