अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- कुकडी नदीवरील पुल तयार करण्यात यावा यामागणीसाठी गेल्या काही दिवसांपूर्वी पारनेर पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर यांच्यासह शिष्टमंडळाने खासदार कोल्हे यांची भेट घेतली होती.
दरम्यान हि भेट सत्कारणी ठरली आहे. नगर व पुणे जिल्ह्याला जोडणारा व दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारा कुकडी नदीवरील पुलासाठी केंद्राकडे पाठपुरावा करून लवकरच उभारणार असल्याची माहिती
खासदार अमोल कोल्हे यांनी दिली. खासदार कोल्हे म्हणाले, दोन्ही वडनेर ही गावे नगर – पुणे जिल्हांच्या सरहद्दीवर असून दोन्ही गावांमधून कुकडी नदी वाहते.
कुकडी नदीवर पूल बांधण्यापूर्वी शिरुर तालुक्यातील वडनेर खुर्द – टाकळी हाजी – मलठण – शिक्रापूर मार्ग आणि पारनेर तालुक्यातील वडनेर बु – निघोज – पिंप्रीजलसेन – पारनेर हे मार्ग इतर जिल्हा मार्ग असल्यामुळे
हा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित होता. या मार्गांना जिल्हा मार्गाचा दर्जा द्यावा लागेल आणी वडनेर खुर्द ते ब्राम्हणठिका हा मार्ग त्या समाविष्ठ करुन हा मार्ग पंतप्रंधान ग्रामसडक योजनेत बसवून सदर कुकडी नदीवरील पुलाचा मार्गी लावण्यात येईल.
त्यासाठी अहमदनगरचे खासदार डॉ.सुजय विखे यांचीही मदत लागणार आहे. त्यासाठी खासदार विखे व मी संयुक्त प्रयत्न करुन प्रश्न मार्गी लावू. कुकडी नदीवर पूल व्हावा,ही दोन्ही गावांची अनेक वर्षांची मागणी असून
कुकडी नदीवर पूल झाल्यानंतर पारनेर तालुक्यातील वडनेर, शिरापूर या गावांसह 10 ते 15 गावांमधील ग्रामस्थांना पुणे शहराचे अंतर 25 कि.मीने कमी होणार असून शेतमाल वाहतूक व विद्यार्थी वर्गास या पुलाचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved