अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत बलात्कार

Published on -

पाथर्डी – तालुक्‍यातील 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे.

याबाबत पीडित मुलगी व तिच्या पित्याच्या जबाबावरून पाथर्डी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा व ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्‍यातील 17 वर्ष वयाची अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत होती.

पोकलेन मशीनवर ड्रायव्हर असलेल्या सोपान प्रभाकर कदम (वय 24, रा. अडा ता. कळमनुरी, जि. हिंगोली) याने 13 जुलै रोजी अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले व तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले.

याबाबत पीडित मुलीच्या व पित्याच्या जबाबावरून आरोपी सोपान कदम यांचे विरोधात भादवि कलम 363, 376, बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा 2012 चे कलम 3 व 4 सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News