त्या सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात शेतकरी नेते झाले आक्रमक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संदर्भातील प्रलंबित विविध मुद्द्यांवर शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला असून संघर्ष क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी त्यास पाठिंबा दिला आहे.

समस्यांची सोडवून केली जात नसल्याने अभिलेख कक्षाच्या गलथान कारभाराविरोधात हे आमरण उपोषण सुरु केले आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेले कपाशी पिक श्रीगोंदा येथील मार्केट मध्ये विक्रीस आणल्यानंतर त्यांना शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावा प्रमाणे व्यापारी बाजारभाव देत नसून व्यापारी त्यांची लूट करत आहेत.

तरी ही लूट तातडीने थांबवून, व्यापारी यांना त्याप्रमाणे कापूस खरेदी करणेस सुचना द्यावेत व व्यापारी ऐकत नसतील तर, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत व तालुक्यात कापूस,बाजरी,मका या पिकांचे खरेदी केंद्र सुरू करावेत.

तसेच श्रीगोंदा तालुक्यातील नागरिकांना व्यक्तीगत कामासाठी लागणारे फेरफार व रेकॉर्ड हे आवश्यक असतात, परंतु ते मिळविण्यासाठी त्यांना श्रीगोंदा तहसील विभागामध्ये चकरा माराव्या लागतात.

वेळेवर कोणतेही रेकॉर्ड अगर फेर उपलब्ध करून दिले जात नाहीत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना आर्थिक झळ बसत असून, वेळही वाया जात आहे.

तरी बेशिस्त चालले कामकाज ताबडतोब थांबून सर्व संबंधित व्यक्तींना सूचना देवून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी व नागरिकांना न्याय द्यावा.अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान नूतन तहसीलदार यांनी खाजगी कर्मचारी काढून टाकल्यानंतर सर्व सामान्य जनतेला कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.

यामध्ये सामाजिक घटकातील शेतकरी युवक विद्यार्थी या सर्व नागरिकांना २० दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची कागदपत्रे मिळत नसल्यामुळे जनतेमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

त्यामुळे या गलथान कारभाराला वाचा फोडण्यासाठी जेष्ठ नेते राजेंद्र म्हस्के आणि प्रशांत दरेकर यांनी तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरु केले आहे त्याच्या या उपोषणास शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment