कार्यालयांच्या ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह आर्थिक दंड !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,20 मे 2020 :-  कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास शिक्षेसह दंडही ठोठावला जाणार आहे. इतकेच नाही तर सार्वजनिक तसेच कार्यालयांच्या ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय दिशा- निर्देशांचा हवाला देत कार्मिक मंत्रालयाने सर्व विभागांना निर्देशांचे कठोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. केंद्र सरकारच्या सर्व विभागांना यासंबंधीचे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संकटाला रोखण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार कार्यालय व सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना शिक्षेसह आता आर्थिक दंडही दिला जाणार आहे.

कार्यालयाच्या ठिकाणी अनेक कर्मचारी व इतर लोक पान व गुटखा खाऊन थुंकताना दिसून येतात. पण नवीन निर्देशांमुळे सरकारी, खासगी कार्यालय व त्याच्या आजूबाजूच्या स्थिती सुधारण्याची आशा उंचावली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आणि सर्व केंद्रीय सरकारी विभागांसह कार्मिक मंत्रालयाला देण्यात आलेल्या दिशा-निर्देशांनुसार कार्यालयांच्या ठिकाणी थुंकल्यास

शिक्षेसह आर्थिक दंड ठोठवला जाणार आहे. राज्य आणि केंद्र शसित प्रदेश आपल्या स्थानिक प्राधिकरणाद्वारे शिक्षा व दंड निर्धारित करू शकतील.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment