देशभर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जाहीर केले गेले. त्यानंतर अनेक मजुरांनी आपापल्या राज्यांकडे स्थलांतर केले. परंतु या कठीण काळामध्ये महाराष्ट्रात मजुरांशी विश्वासघात करण्यात आला आहे.
मजुरांना वाऱ्यावर सोडून देत त्यांना स्वगृही जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आणि सत्ताधाऱ्यांवर केली आहे. ‘
महाराष्ट्राच्या विकासासाठी घाम गाणाऱ्या कामगारांचा शिवसेना आणि काँग्रेसच्या सरकारने नुसता छळ मांडला आहे. लॉकडाऊनच्या काळात त्यांच्याशी विश्वासघात करण्यात आला असून,
त्यांना आहे त्याच अवस्थेवर (दुर्लक्षित) ठेवण्यात आलं आहे. शिवाय त्यांना स्वगृही जाण्यासही भाग पाडण्यात येत आहे’,
असं ट्विट करत या आमानवी कृत्यासाठी मानवतेच्या नात्यानेही यासाठी तुम्हाला माफी मिळणार नाही या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर टीका केली.