अहमदनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी आज अहमदनगरमध्ये जाहीर सभा झाली.
मात्र या सभेआधी काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव काळ्या कपड्यांवर बंदी घालण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

जो कोणी सभेला काळे कपडे घालून येत होता, त्याला सभास्थळी प्रवेश दिला जात नव्हता. इतकंच नाही तर खिशात काळ्या रंगाचा रुमाल तर नाही ना हे सुद्धा तपासलं जात होतं.
त्यापेक्षा हद्द म्हणजे काळ्या रंगाची बनियनवरही बंदी घालण्यात आली. काळ्या कपड्यांवर बंदी का असा सवाल तर आहेच,
पण काळी बनियनही काढायला लावणं हे म्हणजे सुरक्षेच्या नावावर अघोरी प्रकार म्हणावा लागेल.
नगर येथे झालेल्या प्रचार सभेत काळे कपडे घातलेल्या महिला, पुरूषांना प्रवेश नाकारण्यात आला. बुरखाधारी महिला, तसेच काळ्या ओढण्या असलेल्या महिलांनाही सभेपासून रोखण्यात आले.
दरम्यान अनेकांनी या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. काळे कपडे नेमके का नाकारले जात होते, हे अनेकांना समजले नव्हते.
याआधीही पंतप्रधानांच्या जाहीर सभांसाठी पोलीसांनी लोकांचे कपडे उतरवल्याचे व्हिडीयो व्हायरल झाले होते. केवळ शर्टच नव्हे तर काळी पँट सुद्धा पोलीसांना पसंत नसल्याचं समोर आलं आहे.
- Ahilyanagar News दहशतवादी हल्ल्यानंतर अहिल्यानगरमधील अनेक पर्यटकांनी काश्मीरच्या सहली केल्या रद्द
- पुणेकरांसाठी गुड न्यूज ! 6,500 कोटी रुपयांच्या ‘या’ रोड प्रोजेक्टला मिळाली कॅबिनेटची मंजुरी, कसा आहे संपूर्ण प्रकल्प ?
- काश्मीरमधील पर्यटकांना खा. लंके यांचा मदतीचा हात सर्वतोपरी मदतीची ग्वाही
- वडिलोपार्जित संपत्ती विकण्यासाठी कोणाची परमिशन घ्यावी लागते ? वाचा….
- मुर्दाबाद.. मुर्दाबाद.. पाकिस्तान मुर्दाबाद… घोषणाबाजी करत पाकिस्तानचा झेंडा शिवसेना ठाकरे पक्षाने जाळला ;