अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नगरला प्रचार सभा होणार आहे.
सावेडीतील निरंकारी भवनाच्या पाठीमागे असलेल्या मैदानावर सभेसाठी व्यासपीठ, सभेला येणार्या नागरिकांसाठी सुमारे साडेतीन लाख चौरस फुटांवर मंडप उभारणी करण्यात येत आहे.

सभेच्या ठिकाणी सुमारे दोन हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन आहे. जिल्ह्याबाहेरील पोलिसांचा ताफा पाचरण करण्यात आला आहे.
पोलिसांकडून सभा परिसरातील रहिवाशांची माहिती घेण्यात आली. सकाळी साडेनऊच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
मागील लोकसभा निवडणुकीसाठी मोदी यांची सभा याच मैदानावर घेण्यात आली होती. परंतु, मंडपाची व्यवस्था करण्यात आली नव्हती.
सुमारे आठ एकरच्या मैदानावर सभा होत आहे. त्यातील काही भागात स्टेज व मंडपाची उभारणी करण्यात येत आहे. मंडप उभारणे, साउंड सिस्टिमसाठी सुमारे तीनशे कामगार गेल्या तीन दिवसांपासून काम करत आहे.
या सर्व कामगारांना पोलिस विभागाकडून पास देण्यात आलेले आहेत. पास असल्याशिवाय कोणालाच मैदानात सोडले जात नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाहनांचा ताफा तारकपूर रोडकडून सभेच्या ठिकाणी जाणार आहे. या सभेमुळे परिसरातील रस्ते प्रशासनाकडून चकाचक करण्यात येत आले.
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आले आहेत. खडीकरण करून त्यावर डांबरीकरण करण्यात आले. रस्त्यांवरील स्पीडबे्रकर काढण्यात आले आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव सकाळी सहा वाजल्यापासून येथील रस्ते सर्वसामान्यांना वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
संत निरंकारी निरंकारी भवनाच्या पाठीमागे असलेल्या मैदानावर सभेसाठी व्यासपीठ उभारण्याचे काम अंतिम टप्यात आले आहे. 40 बाय 80 फुटाचे भव्य असे व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
व्यासपीठावर मोदींसमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, पालकमंत्री राम शिंदे, उपनेते अनिल राठोड यांच्यासह भाजप आमदार व महायुतीचे जिल्हाध्यक्ष व उमेदवार असणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा सकाळी साडे नऊ वाजता नगरला होणार आहे. यादिवशी सकाळी ते दिल्लीहून विमानाने शिर्डीला येणार असून,
तेथून हेलिकॉप्टरने नगरच्या लष्कराच्या हद्दीतील हेलिपॅडवर उतरणार आहेत. तेथून कारने सभास्थानी येणार आहेत.
याचवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले स्वतंत्र हेलिकॉप्टरने पोलिस मुख्यालयाच्या हेलिपॅडवर उतरणार असून, तेथून कारने सभास्थानी येणार आहेत.
- साईदरबारी महिलेने केलेल्या संकल्पाची पूर्ती! खास इंग्लडहून येत साईचरणी अपर्ण केला तब्बल ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट
- Toyota Vellfire ने केला मोठा रेकॉर्ड, अशी बनली लक्झरी कार बाजाराची राणी!
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?