अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी (मंगळवार 20 ऑक्टोबर) 6 वाजता देशाला संबोधित केले.
लॉकडाऊन गेला असला तरी अद्यापही कोरोना व्हायरस गेलेला नाही. गेल्या 7 ते 8 महिन्यांत देशातील प्रत्येक नागरिकानं भारताची परिस्थिती बिघडू न देण्यासाठी प्रयत्न केले आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
देशात कोरोनातून रुग्ण बरे होण्याचा दर चांगला आहे. आज देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण चांगलं आहे. मृत्यूचे प्रमाण कमी आहे. जगातील संपन्न देशांपेक्षा जास्तीत जास्त नागरिकांचे प्राण वाचविण्यात भारत यशस्वी होत आहे.
कोविड महामारीविरूद्धच्या लढाईत वाढत्या चाचण्या ही एक आपली मोठी शक्ती आहे. सेवा परमो धर्म: च्या मंत्रानं डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी नि: स्वार्थपणे एवढी मोठी लोकसंख्येला सेवा देत आहेत.
या सर्व प्रयत्नांमध्ये निष्काळजीपणाची ही वेळ नाही. कोरोना निघून गेला आहे किंवा कोरोनामुळे आता कोणताही धोका नाही, असे समजण्याची ही वेळ नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved