अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आद्यपही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी शासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे.
परंतु काही बेजबाबदार नागरिकांकडून शासनाच्या या नियमांची पायमल्ली केली जात आहे. या नागरिकांना त्याची चूक लक्षात आणून देण्यासाठी पोलिसांनी खाक्या न दाखवता चक्क गांधीगिरीचे अवलंबन केले आहे.
कोरोना महामारीच्या संकटमय काळात विनामास्क रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढतच चालल्याने नेवासे पोलिसांनी या ”बिनफिकीर्यां’च्या विरोधात दंडात्मक कारवाई न करता “जीवाला जप आरोग्याची काळजी घ्या” अशी समज देत गुलाबपुष्प व मास्क देऊन गांधीगिरी अभियान सुरू केले आहे.
दरम्यान पोलिसांनी आतापर्यंत चक्क एक हजार चारशे जणांना गुलाबपुष्प व मास्क देऊन सत्कार करण्यात आले. या गुलाबांच्या संख्येवरुनच समजून येते कि नागरिक अद्यापही कितीही बेजबाबदार वागत आहे.
दरम्यान पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहाचे औचित्य साधून नेवासे पोलिसांनी ‘गांधीगिरी’ अभियान नेवासे, नेवासे फाटासह आदी बाजारपेठांचा गावांत राबविले.
विशेष म्हणजे बिनफिकीर्यांनी पोलिसांच्या या अभियांनाचा धसका घेतला असल्याचे अनेकांनी मास्क बांधणे पसंत करत असल्यावरून दिसून येत आहे.
नेवासे पोलिसांनी नेवासे शहरात श्री खोलेश्वर गणपती, नगरपंचायत तर नेवासे फाटा येथे राजमुद्रा, डॉ बाबासाहेब आंबेडकर या चौकांत तर तालुक्यातील कुकाणे, भानसहिवरे, भेंडे, प्रवरसंगमसह आदी गावांत बसथांब,
मुख्य चौकात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना तसेच दुचाकी , चारचाकी वाहन चालकांना अडवून समज देत त्यांना मास्क लावून गुलाबपुष्प भेट देऊन सत्कार करून गांधीगिरीने प्रबोधन करण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved