अलिबाग : अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने यांनी रविवारी आपल्या महाड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महाड पोलीस याबाबत तपास करत आहेत. जिल्हा पोलीस दलातील पोलिसांच्या आत्महत्येबाबतची ही चौथी घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रायगड पोलीस दल चर्चेत आले आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने हे गेली १५-२० वर्षे पोलीस खात्यात सेवेत होते. सध्या त्यांची नेमणूक अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयात होती. २९ जानेवारी ते १३ फेब्रुवारीपर्यंत ते रजेवर होते.