ब्रेकिंग : शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

Ahmednagarlive24
Published:

शिर्डी :- शिर्डीत पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केलाय. धक्कादायक म्हणजे, अनैतिक कृत्यासाठी लफडेखोरांना खोल्या दिल्या जातात. एक – दोन तासासाठी २ ते ५ हजार घेतले जातात.

शिर्डीत काही हॉटेल, लॉजमधून वेश्या व्यवसाय चालतो तसेच असे प्रकार नेहमी घडतात. मात्र जे उघड होतात ते समोर येतात.अशाच एका प्रकारात काल डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गुप्त खबरीवरुन हॉटल साईधाम येथे पोलिसांनी छापा टाकून ३ महिलांसह १० जणांना पकडले.

धक्कादायक बाब म्हणजे एक १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी वेश्या व्यवसायासाठी आणल्याचे समोर आले. हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी भांडाफोड केला.

याप्रकरणी हे. का अहमद महेबुब शेख यांच्या फिर्यादीवरुन आरोपी गणेश सिताराम कानडे, वय ३५ रा. श्रीरामनगर, शिर्डी, सुनील शिवाजी शिंग, वय २६, रा. विठ्ठलवाडी, शिर्डी, सागर बाबुराव जाधव, वय ३२, रा. पाटोदा, ता. येवला, हॉटेल मॅनेजर तथा हॉटेल चालक विष्णू अर्जुन ठोंबरे, वय २२, रा. भायेगाव, ता. वैजापूर,

सचिन रामभाऊ शेळके, रा. कोकमठाण, ता. कोपरगाव, अक्षय भाऊसाहेब बगळे, रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव, गोपीनाथ रावसाहेब हिंगे, रा. पिंपळवाडी, यांच्यासह मंगल, रा. राहाता, किरण रा. शिर्डी, अनुराधा, रा. शिर्डी या तरुण महिलांविरोधात दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment