औरंगाबाद:- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
महायुतीच्या नावाखाली मते घेतली आणि काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत आघाडी केल्याने फसवणूक झाल्याची तक्रार, रत्नाकर भीमराव चौरे यांनी पोलिसात दाखल केली आहे.
या तक्रारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि प्रदीप जैस्वाल यांची नावं आहेत. औरंगाबादच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाशिवआघाडी करून सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. तक्रारदार रत्नाकर चौरे यांनी यावर आक्षेप घेतला आहे.