कोरोना काळात मुक्या प्राण्यांना पोलिसांचा आधार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,11 जुलै 2020 :  कोराना या संसर्गजन्य आजार नियंत्रीत ठेवण्याकरीता भारत सरकार, महाराष्ट्र सरकार,अहमदनगर जिल्हा प्रशासन व अहमदनगर जिल्हा पोलीस दल दिवस – रात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करुन स्वत:च्या जिवाची काळजी न करता अहोरात्र काम करत आहेत. महाराष्ट्रामध्ये संचारबंदी लागु करण्यात आलेली असुन त्यात वेळोवेळी वाढ करण्यात आलेली आहे.

मा.जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी अहमदनगर शहर व परिसरात कोरोना आजाचा संसर्ग वाढल्याने अहमदनगर शहर व लगतचे परिसरातील कोरोना संसर्ग असणा-या भागात कंन्टेमेन्ट, हॉटस्पॉट झोन जाहीर करण्यात आलेला असुन सदर परिसर सिल करण्यात आलेला आहे.

अशी भयावह परस्थिती असताना अहमदनगर शहरातील हॉटस्पॉट परिसरातील मुक्या जनावरांना चारा मिळत नसल्याने अहमदनगर पोलिस दलाच्या निदर्शनास आले.

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाने याची दखल घेत. श्री. अखिलेश कुमार सिंह, अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक , श्री.सागर पाटील अप्पर पोलिस अधीक्षक अहमदनगर, श्री.संदिप मिटके DYSP नगर शहर विभाग अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शना प्रमाणे

अहमदनगर शहर व परिसरातील तोफखाना, सिद्धार्थ नगर, पद्मा नगर झोन, हॉट स्पॉट झोन मधील मुक्या प्राण्यांना चाऱ्याचा पुरवठा केला आहे. मुक्या जनावरांना चारा पुरवून पोलिस मुक्या जनावरांसाठी माऊली झाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहेअहमदनगर शहर पोलीसांच्या या अनोख्या उपक्रमाचे समाजातुन कौतुक होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment