राज्यात कोरोनाने थैमान,राज्यपालांच्या भवनात राजकीय हालचालीना वेग !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,26 मे 2020 :-राज्यात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. ठाकरे सरकार या विरुद्ध चांगलेच कंबर कसून लढत आहे. परंतु याच काळात काहीतरी राजकीय शिजत असल्याचा वास येत आहे.

त्याच कारणही तसेच आहे. कारण राज्यपालांच्या भवनात राजकीय हालचालीना वेग आला आहे. विविध नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्याने आता अनेक चर्चांना उधाण आले आहे.

शरद पवार यांना राज्यपालांनी आमंत्रित केले होते; त्यानुसार आम्ही गेलो. त्यात राजकीय चर्चा काहीही नव्हती. ही सदिच्छा भेट होती, असे पटेल यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

या भेटीनंतर काहीच तासात भाजपचे राज्यसभा सदस्य व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राजभवनवर राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली.

राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी आपण राज्यपालांकडे केली, असे त्यांनी नंतर पत्रकारांना सांगितले. गेल्या आठवड्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती आणि कोरोनासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी राज्य सरकारला निर्देश द्या, अशी मागणी केली होती.

दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी राजभवनावर कोरोनाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित राहणार होते

पण ते गेले नाहीत त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे राज्यपालांना जाऊन भेटले आणि राज्यपालांचे व उद्धव ठाकरे यांचे संबंध पिता-पुत्राप्रमाणे आहेत असे विधान त्यांनी केले होते.

राज्यपालांशी राज्य सरकारचे संबंध ताणले गेले असताना शिवसेनेचा हा दिलजमाईचा प्रयत्न थोडा चकित करणारा होता. या सर्व घडामोडीनंतर काहीतरी राजकीय वातावरण ढवळून निघेल असे काही घडणार आहे का अशा चर्चा जनतेमधून रंगू लागल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment