अहमदनगर :- बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून १२ जाती एकत्रित करून लढा उभारणीला राज्यात यश मिळत आहे. शरद पवार, बाळासाहेब विखे यांच्या नातवांची चर्चा होते, मग आपल्या नातवांची का नको?
ओबीसीमधील ३४६ जातीपैकी फक्त ५-६ जाती राजकारणात प्रवेश करतात. १२ बलुतेदारांच्या माध्यमातून या १२ जाती एकत्रित आल्याचे पाहून राजकारणी आता जागे झाले.
तेव्हा आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र मतदारसंघाची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर मागणी करू, असे प्रतिपादन बारा बलुतेदार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले.
नगर-दौंड रोडवरील लोणी व्यंकनाथ येथे लोकशाही संवाद परिषदेत जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन करताना दळे बोलत होते. बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार, ओबीसी, भटके-विमुक्त जाती, आदिवासी, विशेष मागासवर्ग यासह बहुजन समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.
दळे म्हणाले, या संवाद यात्रेतून १७ ते १८ जिल्हे फिरलो, सर्वांचा प्रतिसाद पाहता आपल्या महासंघाला स्वतंत्र मतदारसंघाची गरज आहे, असे दळे यांनी स्पष्ट केले. व्या
सपीठावर १२ बलुतेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संदेश चव्हाण, प्रताप गुरव, दत्तात्रय चेचर, साहेबराव कुमावत, दशरथ राऊत, प्रा. पोपळघट, दीनानाथ वाघमारे, जिल्हाध्यक्ष माउली गायकवाड, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, युवक अध्यक्ष विशाल जाधव, रोहन बंटी, अजय रंधवे, विजय क्षीरसागर आदी उपस्थित होते.
- कोविडनंतर जगभरात वाढले ‘ब्रेन फॉग’चे रुग्ण, जाणून घ्या याची लक्षणे आणि उपाय!
- एसटी महामंडळाचा कर्मचाऱ्यांसाठी आताचा सर्वात मोठा निर्णय ! 5, 6 आणि 7 जुलै रोजी……
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अजूनही अर्ज करता येणार का ?
- ‘या’ दोन नामाक्षरांच्या लोकांनी कधीच एकमेकांसोबत लग्न करू नये, अन्यथा आयुष्यभर होईल पश्चात्ताप!
- महाराष्ट्रातील ‘या’ शहरात विकसित होणार 20 हजार कोटी रुपयांचा मेगाप्रकल्प ! जग्वार आणि मिग-29 लढाऊ विमाने, अपाचे हेलिकॉप्टरची दुरुस्ती होणार