राहुरी :- मागील पाच वर्षांत जिल्ह्यात सर्वाधिक विकास कामे झाले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा भाजप सेनाच सत्तेवर येणार असल्यामुळेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांचे मला भाजप पक्षात प्रवेशासाठी दररोज फोन येत आहेत. असे आ. कर्डिले म्हणाले. त्यामुळे आ. कर्डिले यांना नेमके कुणाचे फोन येतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी ते मांजरसुंबा रस्ता दुरुस्ती दोन कोटी, मांजरसुंबा अंतर्गत रस्ते दहा लाख, पिंपळगाव माळवी ते वांबोरी फाटा रस्ता दुरुस्ती 75 लाख, आढाववाडी अंतर्गत रस्ते 7 लाख, मेहेर बाबा फाटा रस्ता दुरुस्ती लाख आदी विकास कामाचा प्रारंभ आमदार कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी ते बोलत होते. यावेळी बाजीराव गवारे, संभाजी पवार, सरपंच सुभाष झिने, प्रा. देवराम शिंदे, माजी सरपंच संतोष झिने, एकनाथ गुंड, विश्वनाथ गुंड, इंद्रभान कदम, सागर गुंड, नानासाहेब झिने आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामाला जी गती मिळाली नाही, ती गती भाजप सरकारच्या काळात मिळाली. त्यामुळे नगर-राहुरी-पाथर्डी मतदार संघात शंभर कोटी रुपयाचा निधी मिळाला आहे.
बजेटच्या रस्त्यासाठी दोन कोटी निधी मिळत होता. मात्र, आता भाजप सत्तेवर आल्यापासून दरवर्षी 25 ते 30 कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी मिळत आहे. पंचवीस वर्षांचा निधी पाच वर्षांत भाजप सरकार मुळे मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
- सुझलॉन एनर्जी कंपनीचा स्टॉक 54 रुपयांवर! पुढे काय होणार ? स्टॉक BUY, SELL करावा की HOLD, एक्सपर्ट म्हणतात….
- Samsung Galaxy S24 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट !
- SBI ची एफडी की पोस्ट ऑफिसची एफडी योजना ? कोणत्या एफडी मधून मिळणार सर्वात जास्त परतावा ? वाचा….
- Tata घाबरली Tesla ला ! लॉन्च करणार 25 लाख रुपयांना परवडणारी लँड रोव्हर…
- SBI ची ‘ही’ स्पेशल FD स्कीम ठरणार फायदेशीर ! 31 मार्च आहे गुंतवणुकीची शेवटची तारीख