शरद पवार हेच खरे जाणते नेते -घनश्याम शेलार.

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा :- लोकसभेसाठी तिकीट मिळणार नसल्याचे सेना-भाजपचा युतीमुळे स्पष्ट झाल्याने घनश्याम शेलार यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत असल्याचे गुरूवारी पत्रकार परिषेदत जाहीर केले.

त्यांचे समर्थक असलेले तालुकाप्रमुख संजय आनंदकर, बाळासाहेब पवार, राजाराम जठार आदींनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला.

शिवसेनेने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले, स्वबळाचा नारा दिला, मात्र ऐनवेळी युती केल्याने शिवसैनिकांचा भ्रमनिरास झाल्याचे शेलार यावेळी म्हणाले

शरद पवार हेच खरे जाणते नेते असून त्यांना शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या प्रश्नांची चांगली जाणीव आहे, असे सांगत शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वळचणीला जाणार असल्याचे संकेत दिले.

आमदार राहुल जगताप यांच्याशी आपले तात्विक वाद होते. ते जगताप यांनी दुरुस्त केले असल्याचे शेलार यांनी यावेळी जाहीर केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment