अहमदनगर :- भाजप तालुकाध्यक्ष व त्यांच्या साथीदारांपासून मुक्ती मिळावी, मालकीच्या जागेवर कंपाऊंड बांधून केलेले अतिक्रमण त्वरित थांबावे व भाजप तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल करावा,
अन्यथा इच्छा मरणास परवानगी द्यावी आदीमागण्यांसाठी कल्याण सुरवसे यांच्या कुटुंबाने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कल्याण सुरवसे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मी दि. १२ जुलै रोजी हॉटेलवर जात असताना नातेवाईकांनी संगनमताने मला अडवुन दहा लाख रुपयांची मागणी करुन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली.
यातील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष असल्याने वारंवार शासकीय अधिकाऱ्यांकडुन दबाव आणून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे नाव घेऊन धमक्या देत आहेत. तसेच तुला गावात राहु देणार नाही अशा धमक्या देत आहेत.
या लोकांच्या दहशतीमुळे मी माझ्या राहत्या घरी राहू शकत नाही. त्यामुळे मला न्याय मिळाला पाहिजे अन्यथा उपोषण मागे घेणार नसल्याचे कल्याण सुरवसे यांनी सांगितले.
दरम्यान भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे मटका किंग आणि अवैध दारू व्यापारी असून रवी सुरवसे याच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल आहेत.
पालकमंत्री राम शिंदे यांनीच सुरवसे याची निवड केली असून. रवी सुरवसे याच्यावर मटका, जुगारीचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे पालकमंत्री राम शिंदेच गुन्हेगार आणि दहशत माजवणाऱ्याना संरक्षण देत आहेत का सवाल उपस्थित होत आहे.
- International Tiger Day: भारतात वाघांची संख्या वाढली, पण इतर देशांची स्थिती काय?, चिंताजनक आकडेवारी समोर!
- जाती धर्माच्या नावावर सुसंस्कृत संगमनेर शहराला बदनाम करणाऱ्या विकृत प्रवृत्तींचा बंदोबस्त करा
- भावनिक, हुशार आणि गोड बोलणारे…पण प्रेमात खूपच अनलकी ठरतात ‘या अंकाचे लोक!
- शनी-मंगळ युतीमुळे जुलै महिन्यात बनतोय ‘षडाष्टक योग’, ‘या’ 5 राशींसाठी सुरू होणार संकटकाळ!
- मेष ते मीन! राशीनुसार ओळखा तुमच्या पत्नीचा स्वभाव, करिअर आणि घरातील भूमिका