अकोले – भाषा सुधारा, अन्यथा अकोले तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशारा अकोले तालुका युवक कॉंग्रेस नेत्यांनी संगमनेर तालुक्यातील कॉंग्रेस नेत्यांना दिला आहे.
प्रवरा नदीवर असणाऱ्या प्रोफाईल वॉलच्या वादाची याला किनारा आहे. अकोले तालुक्यातील नदीवरील प्रोफाइल वॉल (बंधारे) तोडून टाका,
अशी भाषा करणाऱ्या संगमनेरी नेत्यांनी भाषा न सुधारल्यास तालुक्यात फिरकू देणार नाही, असा इशारा युवक कॉंग्रेसचे जिल्हा महासचिव विकास वाकचौरे व तालुकाध्यक्ष निखील जगताप यांनी दिला आज दिला.
दोन दिवसांपूर्वी संगमनेर येथील काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी तसेच संगमनेर कॉंग्रेसचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी पाण्यासाठी आंदोलन करून संगमनेरचे प्रांताधिकारी व पोलीस विभागीय अधिकारी यांच्यासमोर अकोले येथील नदीवरील बंधारे तोडून टाका, अशी भाषा केली होती.
ही भाषा अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक करणारी असल्याने नागरिक व शेतकऱ्यांत मोठा रोष निर्माण होईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
आमच्याकडे प्रोफॉईल वॉल नाही. असे असतानाही आरोपाची भाषा होते, असे सांगून त्यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. धरणे आमच्या तालुक्यात.प्रकल्पग्रस्त अकोले तालुक्यातील. पुनर्वसनही अकोले तालुक्यातच, असे सांगून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या.
अल्पभूधारक शेतकरी उद्ध्वस्त झाले.अशा परिस्थितीमध्ये संगमनेरचे नेतृत्व व त्यांचे चमचेगिरी करणाऱ्या पुढाऱ्यांनी केलेली ही भाषा तालुक्यात शेतकरी व नागरिकांच्या मनाला उदास करणारी आहे.
म्हणून केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागून बंधारे तोडण्याची भाषा बदलावी. अन्यथा मोठा उद्रेक होऊन अकोले तालुक्यात फिरकू देणार नाही
व अकोले तालुक्याच्या नेतृत्वानेही या घटनेची दखल घेऊन शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा उद्रेक झाल्या शिवाय राहणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
- महाराष्ट्राला लवकरच मिळणार आणखी एक नवा रेल्वे मार्ग ! ‘या’ भागात विकसित होणार 491 कोटी रुपयांचा नवा रेल्वे प्रकल्प
- फिल्मस्टार प्रसिद्धीसाठी धारण करतात ‘हे’ रत्न; किंमतही एवढी की, सामान्यांनाही परवडते
- ‘या’ छोट्या प्रयोगाने समजते तुम्ही आणलेल पनीर खरे आहे की भेसळ? फुकटात होऊ शकतो प्रयोग
- धरणातील गाळ काढण्यासाठी राज्याचे सर्वसमावेशक धोरण करा- विखे पाटील
- महाराष्ट्रातील सर्व शाळांसाठी सरकारची नवीन नियमावली जाहीर !