माजी आमदार अनिल राठोड पुन्हा अस्वस्थ

Published on -

अहमदनगर :- आमदार संग्राम जगताप शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी शहरात सुरू झाली.

या चर्चेमुळे अस्वस्थ झालेले शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

आ. जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असा आग्रह या वेळी सेना पदाधिकारी व नगरसेवकांनी धरला होता.

आता दहीहंडी उत्सवात जगताप समर्थकांनी जय श्रीराम… जय भवानी जय शिवराय, अशी नारेबाजी केल्याने राठोड यांच्यासह त्यांचे समर्थक पुन्हा अस्वस्थ झाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe