शिवाजी कर्डिलेंचे कार्यकर्ते संग्राम जगतापांच्या प्रचारात !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर :- भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचे नगर तालुक्यातील कार्यकर्ते भाजप उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या विरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचे काम करीत आहेत. असा दावा नगर तालुका शिवसेनेने रविवारी केला.

लोकसभा निवडणुकीवरून राहुरीचे आमदार कर्डिले यांचे नगर तालुका भाजपतील समर्थक व तालुका शिवसेनेत सध्या जुंपली आहे.

भाजपचे उमेदवार डॉ. विखे यांच्या प्रचारार्थ भाजप आणि शिवसेना महाआघाडीचे वेगवेगळे मेळावे नगर तालुक्यात झाले.

त्या मेळाव्यात नगर तालुका भाजपकडून शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यावर तर नगर तालुका शिवसेनेकडून भाजप आमदार कर्डिले यांच्यावर शाब्दिक हल्ले झाले.

त्यामुळे तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर तालुका भाजपने पत्रकार परिषद घेतली व ‘आमदार कर्डिले यांच्यावरील टीका सहन करणार नाही. अन्यथा, वेगळा विचार करू’, असा इशारा तालुका शिवसेनेला दिला.

त्याला उत्तर म्हणून तालुका शिवसेनेनेही पत्रकार परिषद घेऊन ‘अंगावर आले तर शिंगावर घेण्याचा’ इशारा तालुका भाजपला दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment