मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड स्वाइन फ्लूने आजारी आहेत. त्यांच्यावर मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये चार दिवसांपासून उपचार सुरू आहेत.
उपचार घेत असतानाही त्यांनी एका व्हिडिओ क्लिपद्वारे आपण कदापि राष्ट्रवादीचा त्याग करून भाजपात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

बरे झाल्यावर प्रचारात सहभागी होणार असून जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पिचड यांनी केले आहे.
पक्षाच्या फेसबुक पेजवर हे आवाहन प्रसारित करण्यात आले. आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादीचे अन्य दोन आमदार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या बातम्या सोशल मीडियात प्रसिद्ध झाल्या होत्या.
मागील आठवड्यातच या वृत्ताचे आमदार पिचड यांनी अकोल्यातील आपल्या पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन जाहीर खंडन केले आहे. या संदर्भातील आपली भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.