आ.मुरकुटे यांना विधानसभेचे तिकीट देऊ नये.नाही तर पराजय ठरलेला आहे…

Ahmednagarlive24
Published:

नेवासे :- आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेहमी सेटलमेंटचे राजकारण केले असून निष्ठावान कार्यकर्त्यांचा राजकीय बळी त्यांनी दिला. तालुक्याचे पाण्याअभावी वाळवंट त्यांनी जसे केले. तसेच निष्ठावान कार्यकर्ते यांचेही त्यांनी वाळवंट केले.

फक्त ठरावीक पाहुण्यांसाठी आमदारकी पणाला लावली असून त्यांना यावेळी विधानसभेचे तिकीट मिळू नये यासाठी तालुक्यातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यामागे खंबीरपणे उभा राहणार आहे, असा घरचा आहेर भाजपचे तालुका उपाध्यक्ष राजेंद्र बोरुडे यांनी दिला.

याबाबत भाजपचे तालुका उपाध्यक्ष बोरुडे म्हणाले, मी आजही भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. सोनई पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचे प्रकाश शेटे यांचेच काम करणार आहे. परंतु याही निवडणुकीत आपल्या राजकीय स्वार्थासाठी युवा नेत्याला त्यांनी राजकीय बळी दिला.

या पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाकडून ‘मोलाचे’ सहकार्य झाले. परंतु जसे मागील पंचायत समिती, जिल्हा परिषद व लोकसभेला हे ‘मोलाचे’ सहकार्य खाली येऊ दिले नाही. तसेच याही वेळेस कार्य त्यांनी केले.

राज्यात, देशात भाजप निर्विवाद सत्ता राखत असताना नेवासे तालुक्यात नेवासे नगर पंचायत, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती सह सर्व निवडणुकीत भाजपला अपयश आले. याला सर्वस्वी आमदार मुरकुटे हेच जबाबदार असून त्यांच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी त्यांनी अनेक निष्ठावान कार्यकर्त्यांचा वापर केला.

गेल्या ३ वर्षांपासून तालुक्यातील अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांची स्पष्ट भावना आहे की आमदार मुरकुटे यांना विधानसभेचे तिकीट देऊ नये. नाही तर पराजय ठरलेला आहे. त्याऐवजी भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिल्यास परत एकदा भाजपचा झेंडा नेवासे तालुक्यावर फडकेल.

या निवडणुकीतही आमदार मुरकुटे यांनी शेटे यांच्यासारख्या लढवय्या तरुणाचा राजकीय बळी दिला असल्याचा गौप्यस्फोट बोरुडे यांनी केला. दरवेळेप्रमाणे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने याही निवडणुकीत कार्यकर्त्यांना बळ मिळण्यासाठी व राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असलेली ही जागा जिंकण्यासाठी ‘भरीव’ आणि ‘मोलाचे’ सहकार्य केल्याकडे बोरुडे यांनी लक्ष वेधले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment