‘बबन्या’ भाजपमध्ये प्रवेश करताच ‘बबनराव’ कसा झाला ?

Ahmednagarlive24
Published:

22 ऑगस्ट 2019 :- विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी जाहीर सभेत राज्य सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

आज जे नेते भाजपमध्ये जात आहेत तेच नेते राष्ट्रवादीत असताना त्यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच नेते भाजपमध्ये जातात तेव्हा त्यांना पावन करून घेतलं जातं असा हल्लाबोल त्यांनी केला.

ते म्हणाले, बबनराव पाचपुते हे आज भाजपमध्ये आहेत. ते जेव्हा राष्ट्रवादीत मंत्री होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

भाजपसाठी त्यावेळी ते ‘बबन्या’ होते. मात्र पाचपुते भाजपमध्ये गेल्यावर त्यांच्यावरचे भ्रष्टाचाराचे सर्व आरोप धुतले गेले आणि ते बबनराव झाले अशी टीकाही त्यांनी केली.

भाजप राज्यात सूडाचं राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षातल्या नेत्यांना वेचून वेचून लक्ष्य केलं जातं आहे.

त्यांच्याविरुद्ध चौकशांचा ससेमीरा लावला जातोय. पण आम्ही या दडपशाहीला घाबरणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment