अहमदनगर :- डॉ. सुजय विखे यांना अहमदनगर मतदारसंघातून तब्बल २ लाख ८१ हजार ४७४ मताधिक्य मिळाले. पाथर्डी तालुक्यातून सर्वाधिक ५४ हजार ८३५ मताधिक्य असून दुसऱ्या क्रमांकाची ५४ हजार १४९ मते नगर तालुक्यातून मिळाली.
या मताधिक्यात महाआघाडी आणि निष्ठावंत भाजपचा वाटा आहे. आमदार शिवाजी कर्डिले यांचा या यशात कोणताही संबंध नाही. त्यांना जनतेने सपशेल नाकारले, असा आरोप महाआघाडीने रविवारी पत्रकार परिषदेत केला.


हॉटेल यश पॅलेस येथे झालेल्या महाआघाडीच्या पत्रकार परिषदेस शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, नगरसेवक योगीराज गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, शरद झोडगे, अनिल कराळे, काँग्रेसचे बाळासाहेब हराळ, सभापती रामदास भोर, प्रवीण कोकाटे, तालुकाप्रमुख राजू भगत, खडकीचे उपसरपंच भाऊसाहेब रोकडे, संजय कोतकर आदी उपस्थित होते.
गाडे म्हणाले, नगर तालुक्यातील गावे श्रीगोंदे, पारनेर व राहुरी मतदारसंघात विभागली गेली असल्याने नगर तालुक्यातुन नक्की किती मताधिक्य कोणाला मिळाले हे दिसून येत नाही. पण आम्ही या तिन्ही मतदारसंघातील नगर तालुक्यातील गावांची आकडेवारी बाजूला केली आहे.
श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या गावांमधून डॉ. विखे यांना १२ हजार १०१, पारनेर विधानसभा मतदारसंघातील गावांमधून २२ हजार १३५ आणि राहुरी विधानसभा मतदारसंघातील गावांमधून १९ हजार ७२ मतांचे मताधिक्य डॉ. विखे यांना आहे.
नगर तालुक्यातील एकूण मताधिक्य हे ५४ हजार १४९ मतांचे आहे. सर्वाधिक मताधिक्य हे पाथर्डी तालुक्यातून ५४,८३५, नगर तालुका – ५४१४९, नगर शहर – ५२२८१, राहुरी – ३९२०८, शेवगाव – १९३८६, श्रीगोंदे – १८४९१, जामखेड – १६०४४, पारनेर – १४५७४, कर्जत – ८६२९ असे मताधिक्य आहे. नगर तालुक्यात जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मताधिक्य आहे.
- Tata Sierra SUV हफ्त्यावर खरेदी करण्याचा विचार करताय ? मग किती डाउन पेमेंट करावं लागणार, संपूर्ण गणित समजून घ्या
- सर्वोच्च न्यायालयाचा सर्वोच्च निकाल ! वन जमिनीवर शेती करता येणार की नाही ? स्पष्टच सांगितलं
- लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी गुड न्युज ! सरकार लवकरच मोठा निर्णय घेणार, नवीन वर्षात…..
- मुंबईत तयार होतोय सर्वात महागडा स्कायवॉक ! कुठे विकसित होतोय सर्वाधिक मोठा आणि महागडा स्कायवॉक ? पहा…
- पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! रेल्वे मंत्रालय 2026 मध्ये ‘या’ वंदे भारतबाबत मोठा निर्णय घेणार ! प्रवाशांवर काय परिणाम ?