जामखेड :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा व राष्ट्रवादीचे खासदार असलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा या दिवशी दुपारी ४ वाजता जामखेडला समोरासमोर येणार आहेत.
या यात्रांच्या सभा वेगवेगळ्या ठिकाणी होणार असल्या तरी यानिमित्ताने भाजप व राष्ट्रवादीचे शक्तिप्रदर्शन या दिवशी जामखेडात होणार असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आव्हान आहे.
फडणवीस यांची दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रा येत्या २५ व २६ रोजी नगर जिल्ह्यात आहे. २५ रोजी अकोले, संगमनेर, राहुरी व नगरला सभा झाल्यावर २६ रोजी पाथर्डी व जामखेडला त्यांच्या सभा होणार आहेत.
जामखेडची त्यांची सभा राऊत मळा, बीड रोड येथे ४ वाजता होणार असून, ती झाल्यावर ते बीडकडे रवाना होणार आहेत.
तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नवे खासदार डॉ. कोल्हे यांनी महाजनादेश यात्रेला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरू केलेली शिवनेरी ते रायगड शिवस्वराज्य यात्रा दुसऱ्या टप्प्यात २६ रोजीच दुपारी ४ वाजता बीडहून जामखेडला येणार आहे.
या वेळी त्यांच्यासमवेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहेत.
त्यांची सभा जामखेड बाजारतळावर होणार आहे. सत्ताधारी व विरोधकांच्या निवडणूक पूर्वयात्रा एकाच दिवशी व एकाचवेळी जामखेडला येणार असल्याने प्रशासन मात्र अस्वस्थ आहे.
दोन्ही सभांच्या ठिकाणांमध्ये सुमारे एक ते दीड किलोमीटरचे अंतर आहे. दोन्ही सभांच्या ठिकाणची कायदा सुव्यवस्था तसेच दोन्हींकडून होणाऱ्या शक्तिप्रदर्शनामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.
- नगर जिल्ह्यात आहे असे एक गाव जिथे प्लॅस्टिकच्या कपात चहा मिळणार नाही !
- Big Breaking ! श्रीगोंद्यात शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जमीन विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
- 8 वा वेतन आयोग : शिपाई, शिक्षक, ते आयएएस अधिकारी कोणाला किती मिळणार पगार ?
- 8th Pay Commission : 10 वर्षांची प्रतीक्षा संपली ! सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार इतकी वाढ
- दुसऱ्याच्या कर्जाला गॅरेंटर बनण्याआधी दहा वेळा विचार करा! नाहीतर येईल कपाळाला हात मारण्याची वेळ