पिचड यांना पवार साहेबांनी खूप काही दिले तरी त्यांनी पक्षांतर केले

Ahmednagarlive24
Published:

पारनेर :- पिचड साहेबांनी पक्षप्रवेश केला कारण त्यांच्या पत्नीविरोधात फसवणुकीचे प्रकरण आहे. पिचड यांच्या पत्नी ज्या बिगर आदिवासी आहेत.

त्यांनी खोटे आदिवासी सर्टिफिकेट दाखवून आदिवासी शेतकऱ्यांची जमीन लाटली आणि समृद्धी महामार्गाच्या नावावर सरकारकडून १४ कोटी ५० लाख रुपयांचा मोबदला घेतला.

त्यामुळे पिचड यांनी भाजपत प्रवेश केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ. धनंजय मुंडे यांनी केला.

शिवस्वराज्य यात्रेत प्रत्येक दिवशी भाजपाच्या मेगाभरती लाभार्थ्यांची पोलखोल करणार असा दावा मुंडे यांनी केला आहे. ते पारनेरमध्ये बोलत होते.

याच सभेत पिचड कुटुंबीयांवर जोरदार हल्लाबोल मुंडे यांनी केला. मधुकर पिचड यांना पवार साहेबांनी खूप काही दिले तरी त्यांनी पक्षांतर केले, अशी टीका मुंडे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment