पाथर्डी – येथील काही ज्येष्ठ कार्यकर्ते भाजपच्या नेत्या व भावी मुख्यमंत्री ना.पंकजाताई मुंडे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी ना.मुंडे यांच्या कडे अँड प्रताप ढाकणे यांना भाजपात घ्या असा आग्रह त्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी धरला होता परंतु ढाकणे हे राष्ट्रवादीत आहेत, त्यांना भाजपात कसे घ्याचे असे उत्तर ना.मुंडे यांच्याकडून आले.
हे उत्तर वंजारी समाजाच्या राजकीयदष्ट्या योग्य नव्हते. या उत्तराने पाथर्डीसह नगर जिल्ह्यातील वंजारी समाजात ना.मुंडे यांच्या या वक्तव्याने नाराजी उमटली असून मग राष्ट्रवादीतील धनदांडगे नेते चालतात, फक्त भाजपाला अँड प्रताप ढाकणे का चालत नाहीत, असाही सवाल विशेषात: वंजारी समाजातून उमटू लागला आहे.

वास्तविक आजही अँड प्रताप ढाकणे यांच्या संपर्कात भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. तसेच तसेच नगर जिल्ह्यात भाजप वाढविण्यात ढाकणे त्यापूर्वी मोलाचे योगदान दिले आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही. परंतु ज्यांनी सगळे हायात राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये दातली ते भाजपात कसे पावन झालेत. ही चर्चा वंजारी समाजात आहे.
यात ना.पंकजाताई मुंडे या अँड प्रताप ढाकणे यांना भाजपात घेण्यास का इच्छुक नाहीत, हे काय गौडबंगाल आहे. याबाबत अनेकांनी आपआपल्या पध्दतीने कयास बांधणे सुरू केले आहेत. पण मुठभर विघ्नसंतोषी लोकांमुळे ना.मुंडे ढाकणेंंना नकार देत असतील तर ही मोठी चूक ठरु शकते. वास्तविक वंजारी समाजाची राजकारणात दिवसेंदिवस कमी कमी होत आहे. हे तीव्र सत्य आहे.
याकडे ना.पंकजाताई मुंडे लक्षकेंद्रीत केले पाहिजेत. स्पर्धक नको म्हणून जर समाजाचे माणसे मोठे करायचे नसेल तर ही कार्यपध्दत समाजाला घातक ठरु शकते. त्यामुळे भविष्याच्या दष्टीने ना.मुंडे यांनी वंजारी समाजातील अँड प्रताप ढाकणे अथवा अन्य कोणत्याही कार्यकत्यास मोठे करण्याचा विचार केला पाहिजे असे वंजारी समाजातील ज्येष्ठ कार्यकर्तेनी मते मांडली आहेत.
परंतु बोटावर मोजण्याइतपत लोकांचे ऐकून निर्णय घेणार असाल तर तो वंजारी समाजाच्या दष्टीने आत्महत्या ठरेल, असे ही मत व्यक्त केले आहे. यामुळेच पुढील काळात ना.पंकजाताई मुंडे या स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी लढा देतात का?
राजकारणात वंजारी समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करतात. हे एकंदरीत त्यांंच्या कार्यपद्धतीतून दिसून येईलच! पण यासाठी ना.मुंडे यांना चाणाक्षाने निर्णय घ्यावे लागतील, नाही तर तूप ही गेले आणि तेल ही गेले हाती आले धुपाटने अशी अवस्था होऊ नये. अशी चर्चा एकंदरीत वंजारी समाजातील सर्व स्तरातून सुरु झाली आहे.
- पुणे, अहिल्यानगरमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मध्य रेल्वे चालवणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कुठून कुठपर्यंत धावणार?
- अहिल्यानगर जिल्ह्यातील पोलिसांच्या कामाबाबत तुम्हाला काय वाटतं? क्युआर कोड किंवा लिंकद्वारे तुमचा अभिप्राय नोंदवा, SP सोमनाथ घार्गे यांचा अभिनव उपक्रम
- महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी यायलाच हवी, अभिनेता सुनिल शेट्टींनी शिर्डीतून केला मराठीचा गुणगौरव
- मुंबई पासून पुण्यापर्यंत सर्वसामान्यांना मोठा दिलासा! एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठी कपात
- अहिल्यानगरमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर ६८ हजार नवमतदार वाढले, ‘या’ तालुक्यात वाढले सर्वाधिक मतदार; जाणून घ्या सविस्तर आकडेवारी!