बाळासाहेब थोरात यांच्या बँकेला आरबीआयकडून दंड

Published on -

संगमनेर :- परवानगी न घेता सभासदांना लभांश वाटप केल्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अधिपत्याखालील संगमनेरच्या भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेला भारतीय रिझर्व बँकेकडून एक लाखांचा दंड करण्यात आला आहे.

बँकिंग रेग्यूलेशन कायदयानुसार ही कारवाई करण्यात आली असून बँकेने सभासदांना लाभांश वाटप करण्यापूर्वी आरबीआयची परवानगी घेणे आवश्यक होते.

मात्र, ती घेण्यात आली नाही. त्यामुळे बँकेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्याला बँकेने दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याने दंड करण्यात आला आहे.

या बँकेची स्थापना १९८३ मध्ये झाली आहे. बँकेकडे सुमारे साडेतीनशे कोटींच्या ठेवी आहेत. सव्वापाचशे कोटींची उलाढाल आहे. १९० कोटींचे कर्जवाटप असून वसुलीही चांगली आहे. त्यामुळे बँकेचा एनपीए १.२६ टक्के तर ऑडिट वर्ग ‘अ’ आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe