संगमनेर :- राज्याच्या मंत्रिमंडळात राधाकृष्ण विखे यांची वर्णी लागताच विखे समर्थक आणि शिवसेना-भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत त्यांच्या निवडीचे रविवारी स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या घडामोडी, त्यानंतर विखे आणि आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील वाढता संघर्ष, विरोधी पक्षनेते आणि आमदारकीचा दिलेला राजीनामा, भाजप प्रवेश अशा घडामोडीत विखे राज्यात केंद्रस्थानी होते.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी उघडपणे भाजपचे काम केल्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश आणि मंत्रीपद निश्चित मानले जात होते.
अपेक्षेप्रमाणे रविवारी त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. शनिवारीच विखे यांना मंत्रिपद मिळणार असल्याचे निश्चित झाले होते, तसा निरोपदेखील त्यांना आला होता.
नगरमधून विखेंचा मंत्रीमंडळात समावेश निश्चित झाल्याने संगमनेरमधून विखे समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांसह माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार, जयवंत पवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आप्पा केसेकर, योगेश बिचकर, भाजपचे तालुकाध्यक्ष काशिनाथ पावसे,
शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, राम जाजू, ज्ञानेश्वर कर्पे, शिरीष मुळे, सुधाकर गुंजाळ, भरत फटांगरे, डॉ. सोमनाथ कानवडे आदीं उपस्थित होते.
त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे तालुक्यातील प्रश्न मार्गी लागण्यास मदत मिळणार असल्याचा समर्थकांचा विश्वास आहे. विखेंच्या अडचणीच्या काळातदेखील संगमनेरकरांनी त्यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली.
- Mahindra Scorpio खरेदीसाठी 400000 रुपये डाऊन पेमेंट केल्यानंतर किती EMI भरावा लागणार ? पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन
- Motorola लवकरच मोठा धमाका करणार! लाँच होणार ‘हा’ नवीन स्मार्टफोन
- ओला, बजाजच्या स्कूटरला टक्कर देण्यासाठी लॉन्च झालेली नवीन इलेक्ट्रिक Scooter ! कसे आहेत फिचर्स?
- तुमच्या आईच्या किंवा वडिलांच्या नावे पोस्टाच्या ‘या’ योजनेत 100000 रुपयांची गुंतवणूक करा, 24 महिन्यांनी मिळणार जबरदस्त रिटर्न
- तारीख ठरली ! ‘या’ मुहूर्तावर लॉन्च होणार वनप्लस 15, किंमत किती राहणार ?