तालुक्याचे गेलेले वैभव पुन्हा येण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करा – माजीमंत्री पाचपुते

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे ;- गेली ३५ वर्षे सामान्य जनतेच्या कृपेने आमदार, मंत्री होऊन सत्तेच्या माध्यमातून तालुक्यात विकासाचे पर्व तयार केले.

जोपर्यंत ताकद होती तोपर्यंत लढलो. पराभव झाला, तरी रणांगण सोडले नाही. आता सर्वांना विश्वासात घेऊनच विधानसभेचा निर्णय घेऊ, असे माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी काष्टी येथे सांगितले.

परिक्रमा शैक्षणिक संकुलात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा खासदार डॉ. सुजय विखे यांच्या विजयाबद्दल आयोजित आभार मेळाव्यात पाचपुते बोलत होते.

पाचपुते म्हणाले, मोदी सरकारने जनतेच्या हिताची कामे केल्याने लोकसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा त्यांना सत्ता दिली.

घोड व कुकडीच्या पाण्याचे नियोजन करण्यात मात्र तालुक्याचे युवा आमदार नापास झाले. तालुक्यात सत्ता नसताना रस्ते, पाणी, विजेच्या समस्या सोडवण्याचे काम आम्ही केले.

माळढोक पक्षी अभयारण्याचे आरक्षण उठवले. घोड कालवा कोणी फोडला, रोटेशन मिळाले नाही म्हणून मानवनिर्मित दुष्काळ करुन या भागातील सव्वा लाख टन ऊस चारा म्हणून तोडला गेला.

आपला साखर कारखाना अडचणीत असताना नावे ठेवली तरी पण अडचणीत मार्ग काढून देणी दिली. राहिलेली लवकरच देणार आहे.

पण आम्हाला नावं ठेवणाऱ्यांनी स्वतच्या कारखान्याची बिले का दिली नाहीत. दोन्ही सहकारी कारखाने अडचणीत आहेत, तरी दुसऱ्याकडे बोट दाखवतात.

माझ्यावर जनतेचे उपकार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी तालुक्यात विकासपर्व घेऊन यायचे आहे. तालुक्याचे गेलेले वैभव पुन्हा येण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे, यश नक्कीच मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment