जे ३५ वर्षांत झाले नाही, ते काम ५ वर्षांत मी करून दाखवले – आ.राहुल जगताप

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे – नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या सुधारणेसाठी राज्याच्या अंदाजपत्रकात २२.८० कोटी व जिल्हा वार्षिक योजनेत २.५ कोटी असा एकूण २५.३० कोटींचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार राहुल जगताप यांनी दिली.

अनेक वर्षांपासून कामे झाली नसल्यामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. नागरिकांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून प्राधान्याने हे रस्ते मंजूर करून घेतले.

जिल्हा वार्षिक योजनेतील काही कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. उर्वरित कामांच्या निविदा लवकरात लवकर निघतील. यापूर्वीच्या लोकप्रतिनिधींनी हजारो कोटींच्या गप्पा मारून प्रत्यक्षात काहीच केले नाही.

कुठल्याही शासकीय निधीची तरतूद नसताना कार्यक्रम केल्यामुळे नारळ, भूमिपूजन, शुभारंभ यावरचा लोकांचा विश्वास उडाला आहे.

जनतेने ३५ वर्षांची सत्ता मुळासकट उपटून टाकून मला सेवा करण्याची संधी दिली. काम होणार असेल तरच आश्वासन द्यायचे, दिलेले आश्वासन पाळायचे ही खूणगाठ मी बांधली होती. जे ३५ वर्षांत झाले नाही, ते ५ वर्षांत मी काम करून दाखवले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment