पाचपुते यांच्या सभेला गर्दी होत नाही, म्हणून दुसऱ्याच्या लग्नात ते आपला साखरपुडा करून घेतात !

Published on -

श्रीगोंदे :- माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या सभेला गर्दी होत नाही, म्हणून दुसऱ्याच्या लग्नात ते आपला साखरपुडा करून घेतात.

मागील ३५ वर्षांत पाचपुते यांनी व साडेचार वर्षांत मी काय केले, हे पाहण्यासाठी संत शेख महमंद महाराज पटांगणात समोरासमोर या.

चुकीची कामे सांगितली, तर विधानसभेला मी अर्ज भरणार नाही, असे आमदार राहुल जगताप यांनी रविवारी पिंपळगाव पिसा येथे बोलताना सांगितले.

लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यात आणि केंद्रात ज्यांना काही समजत नाही, ते पदावर आहेत.

त्यांनी शेतकरी मोडकळीस आणला आहे. पाचपुते यांना ऐकण्यासाठी माणसे जमत नाहीत. त्यामुळे ते आता श्रद्धांजली, दहावा आणि लग्नाच्या कार्यक्रमात आयते लोक सापडले की, भाषणे करतात.

एफआरपीपेक्षा जास्त पैसे देणाऱ्या कारखान्यांवर ३० टक्के कर लावला. हे सरकार सामान्यांना झुलवत आहे. त्यासाठी आता शरद पवार यांचे हात बळकट करावे लागतील, असे आमदार जगताप म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe