खा. सुजय विखेंचा जनता दरबार हाऊसफुल्ल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : जनतेचे प्रश्न व सर्वसामान्य माणसांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आयोजित केलेला जनता दरबार अक्षरश: हाऊसफुल्ल झाला होता.

व्यक्तिगत अडचणींपासून सार्वजनिक प्रश्न घेऊन आलेल्या युवक, महिला व जेष्ठ नागरिकांची गर्दी डॉ. सुजय विखे पाटील यांना भेटण्यासाठी झाली होती.

नागरिकांचे प्रश्न आवधानाने ऐकून, समजून घेत डॉ.विखे आपल्या स्वीय सहायकांना त्याबाबतच्या पुढील कारवाईसंदर्भात निर्देश देत होते. समस्यांचा निवाडा होण्यासाठी गाऱ्हाणे घालणाऱ्या सर्वसामान्यांचा खासदारांना गराडा, असेच चित्र यावेळी आढळले.

लोकसभा अधिवेशनासाठी खा. विखे पाटील दिल्ली येथे रवाना झाले होते. काल रविवार असल्याने सुट्टीचा दिवस होता. सुट्टीच्या दिवसाची संधी पाहूनच डॉ. विखे पाटील यांनी काल आपल्या संपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते.

यावेळी जामखेड, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, श्रीगोंदे, कर्जतसह मतदार संघातील सर्व ग्रामीण भागातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यालयात आगमन होताच काही उत्साही कार्यकर्त्यांनी स्वागताचे उपचार सुरू केले. त्यावर सत्कार नको कामाचं बोला.सत्कारासाठी वेळ नाही. भरपूर कामे मार्गी लावायची आहेत, असे ते म्हणाले.

त्यानंतर कार्यालयात उपस्थित असणाऱ्या नागरिकांच्या रांगेत जाऊन डॉ. विखे पाटील यांनी समस्यांचे अर्ज व निवेदने स्वीकारली.

मुलामुलीचे ॲडमिशन, त्यांना संबंधित महाविद्यालयात राहण्यासाठी होस्टेल, रस्ते, पंतप्रधान सहाय्यता निधी, पाणीपुरवठा, छावण्या यासोबतच महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी सुविधाविषयक प्रश्न निवेदनाद्वारे विखे पा. यांच्याकडे अनेकांनी मांडले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment