अहमदनगर : भाजपचे दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे यांचा उमेदवारी अर्ज भरताना चांगलीच फजिती झाल्याचा प्रकार घडला.
पहिल्यांदा अर्ज दाखल करताना ऐनवेळी अर्ज पाठीमागेच राहिल्याने सुजय विखे संतापल्याचे पाहायला मिळाले.

सोमवारी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजपचे उमेदवार सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजेच्या दरम्यान आले होते.
भाजप चे तीन मंत्री, तीन आमदार, भाजप-सेनेचे पदाधिकारी सर्व जवाजम्यासह अर्ज भरण्यास सज्ज असतानाच सुजय विखे मात्र चक्क अर्जावर सह्या करायलाच विसरले होते !
ऐनवेळी त्यांनी बाजूला येत एका झाडाखाली तीन अर्जांवर घाईघाईत सह्या केल्या. एवढी यंत्रणा असतानाही सह्या कशा विसरल्या ही एकच चर्चा यावेळी रंगली.
या प्रकारामुळे विखे यांचे वकील, तसेच इतर कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली. सह्या उरकल्यानंतर विखे अर्ज भरण्यासाठी रवाना झाले.
- Sun Pharma Share Price: सन फार्मा शेअरमध्ये 12.80% ची उसळी! SELL करावा का? बघा माहिती
- LIC Share Price: LIC चा शेअर तुमच्याकडे आहे का? पटकन वाचा फायद्याची अपडेट
- आज ‘या’ ऑटोमोबाईल कंपनीचा शेअर रॉकेट! 1 महिन्यात 8% रिटर्न…पुढची टार्गेट प्राईस जाहीर
- Prestige Estate Share Price: आज ‘या’ शेअरमध्ये 51% ची घसरण! पैसा मातीमोल… तुमच्याकडे तर नाही ना?
- Yes Bank Share Price: 6 महिन्यात 23.75% ची तेजी! आज होईल का फायदा? बघा अपडेट