डॉ.सुजय विखे आहेत ‘इतक्या’ कोटीचे मालक !

Published on -

अहमदनगर :- नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून डॉ. सुजय राधाकृष्ण विखे यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांच्या अर्ज दाखल केला.

ते 11 कोटी 17 लाखांचे मालक आहेत.  तर त्यांच्या पत्नी धनश्री या 5 कोटी 7 लाखांच्या मालकीण आहेत. विशेष म्हणजे सुजय यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही.

मात्र त्यांच्या पत्नी धनश्री विखेंकडे प्रवरा बँकेचे 26 लाख 23 हजारांचे कर्ज आहे. सुजय यांच्याकडे 4 कोटी 91 लाखांची जंगम आणि 6 कोटी 25 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

गेल्या आर्थिक वर्षात 1 कोटी 68 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न घटून सुजय विखे यांचे वार्षिक उत्पन्न 86 लाख 10 हजार 202 इतके झाले आहे. पत्नीचे वार्षिक उत्पन्न 35 लाख 42 हजार इतके आहे.

सुजय विखे यांच्याकडे सध्या 1 लाख 16 हजार 295 रुपयांची रोकड असून पत्नी धनश्री यांच्याकडे 1 लाख 37 हजार 485 रुपये रोकड आहे.

सुजय यांच्याकडे 3 कोटी 65 लाख 23 हजार 468, तर पत्नीकडे 1 कोटी 90 लाख 91 हजार 617 रुपयांच्या बँक खात्यातील ठेवी आहेत.

सुजय यांच्याकडे 5 लाख 71 हजार 300 रुपयांचे आणि पत्नीकडे 67 हजार रुपयांचे शेअर्स गुंतवणूक आहेत. विखे यांची 16 लाख 65 हजार रुपयांची, तर पत्नीकडे 5 लाख 85 हजार रुपयांची विमा पॉलीसी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News