अहमदनगर :- डोनेशन दिल्यावर विळद घाटात ॲडमिशन मिळते. पेशंट घेऊन त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेलो तर दारातच १० रुपयांची पार्किंगचे पावती फाडावी लागते.
जे पार्किंगचे १० रुपये सोडत नाहीत ते काय मोफत उपचार करतील. फक्त सांगायला जनसेवा आहे. जनसेवेचे नाटक करून सर्वसामान्य जनतेची लूट करून विरोधी उमेदवार मोठे झाले आहेत.
या लुटीतूनच त्यांनी हेलिकॉप्टर घेऊन आमच्या छातीवर उतरवत आहेत, असा आराेप राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी केला.
जगताप रविवारी नगर तालुका प्रचार दौऱ्यावर होते. त्यांनी तालुक्यातील विविध गावांतील जनावरांच्या छावण्यांना भेटी देत शेतकऱ्यांनी संवाद साधला.
ते म्हणाले, पाच वर्षांपूर्वी कांद्याचा, दुधाचा, पेट्रोल, डिझेलचा भाव कमी होता. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात पेट्रोल, डिझेल, गॅसची सातत्याने दर वाढत गेले, तर शेतकऱ्यांची उत्पादने, दुधाचे भाव कमी होत गेले.
त्यामुळे सरकारबद्दल सर्वत्र असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे चीज सरकार करत नाही. म्हणून महाराष्ट्राला पुन्हा एकदा शरद पवार यांची गरज आहे.
आ. छावण्यांमधून सर्व सुविधा मिळत आहे की नाही याबाबत चौकशी केली. भर उन्हात सर्व गावांमध्ये जगताप यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला.