अहमदनगर :- लोणीकरांचा अन्याय आणि पंतप्रधान रोजगार मिळवण्यासाठी तरुणांना वडे भजे तळून पैसे कमवण्याचा देत असलेले फुकटचा सल्ला युवाशक्तीला अपमानित करत आहे.
भाजपकडून तरुणांची होत असलेली थट्टा व लोणीकरांची दादागिरी आता युवक सहन करणार नाही, असा इशारा केदारेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ढाकणे यांनी दिला.

तनपुरेवाडी, अकोला, येळी, भुते टाकळी, शेकटे, येळी, खरवंडी गावातील नागरिकांशी संवाद साधून राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी गाठीभेटी घेतल्या. यावेळी ढाकणे बोलत होते.
यावेळी भीमराव फुंदे, बाळासाहेब ताठे, बंडू बोरुडे, सिताराम बोरुडे, किरण खेडकर, शिवशंकर राजळे, भाऊ तुपे, सुधीर पोटे, नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप यांनी २३ तारखेला मतदानाच्या माध्यमातून दादागिरी आणि पंतप्रधानांकडून तरुणांची होत असलेली थट्टा थांबण्यासाठी मोदींना व लोणीकरांना घरी पाठवा, असे आवाहन केले.
- अहिल्यानगर ब्रेकिंग : 1600 फूट खोल सापडला तरुणाचा मृतदेह ! मित्रांनी सांगितलं तो…
- पालकमंत्र्यांची अवस्था, नाचता येईना अंगण वाकडे अशी !
- Lucky Rashi : भाग्यवान असतात ह्या पाच राशींचे लोक ! तुमची राशी यामध्ये आहे का?
- Vastu shastra : हे 1 चुकलं तर आयुष्यात संकटच संकट! घड्याळाची योग्य दिशा कोणती?
- Toyota Fortuner ला टक्कर देणारी SUV घ्या आणि Maruti Alto किमतीइतकी बचत करा!